Post Header
महामारी विषयक सामाजिक अंतर उपाय व लाॅकडाऊन चे हुकूम वाढल्यामुळे, आम्हाला Archive of our Own- AO3(आमचा स्वत:चा संग्रह) च्या वापरातील बदला-वर बरेच प्रश्न विचारले जात आहेत. लोक आपल्या सांत्वनासाठी रसिक-कृतींकडे वळत आहेत व त्यामुळे रहदारीत वाढ झाली आहे का? निर्माते जास्त कार्य पोस्ट करीत आहेत का? लाेक समुदाय-भावाच्या शोधात जास्त टिप्पण्या लिहीत आहेत का? आेझरती नजर टाकता, या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘होय’ आहे असे दिसते!
आकडे
आम्ही वर्षाच्या सुरुवतीपासूनच यांवर नजर ठेवून आहोत दैनंदिन पृष्ठ दर्शन आणि आमच्या डेटाबेस मधून यासंदर्भात काही आकडे काढले आहेत प्रत्येक दिवशी भर घातलेली कार्य, अध्याय, टिप्पण्या, आणि टाळ्या जी मागील वर्षभरातील आहेत. नेहमीप्रमाणे, आम्ही दर आठवड्याच्या रहदारीचे आकडे बघत आहोत व मागील वर्षांशी तुलना करीत आहोत.
सर्व उपलब्ध डेटा तुम्हाला या स्प्रेडशीट वर सापडेल:
📈 AO3 २०२० आकडेवारी गूगल शीट्स वर (इंग्रजी मध्ये)
दैनंदिन रहदारी
तक्ता: प्रत्येक महिन्याचे दैनंदिन पृष्ठ दर्शन, रहदारीचा सुसंगत नमुना दाखवण्यासाठी आठवड्याचे दिवस एका-पाठोपाठ एक लावण्या सहित. टेकड्या आठवड्याचा अंत दर्शवतात, रविवारच्या स्पष्ट टोकासह, दऱ्या आठवड्याचा मध्य दर्शवतात.
बहुतांशी, रविवारचे टोक व मंद-सर मधले दिवस हा नेहमीचा नमुना अनुसरित होत आहे. परंतु, आपल्या मधील काहींसाठी आठवड्याचा अंत ही संकल्पना थोडी धुसर झाल्यामुळे, टेकड्या व दऱ्या सौम्य लाटांमध्ये सपाट झाल्या आहेत. सर्वसाधारण, रहदारीमध्ये भरपूर वाढ झाली आहे.
दुर्दैवाने, आम्ही आमच्या वापरकर्त्यांचा मोठा तळ घालवला जेव्हा २९ फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये AO3 दुर्गम झाले. या तक्त्यामध्ये, हे पिवळ्या रेषेच्या आधाराने दाखवले आहे जी साधारण दोन आठवडे जानेवारी व फेब्रुवारी च्या टोकांच्या बरीच खालती आहे. मध्य मार्च च्या दरम्यान रहदारी मध्ये परत वाढ झाली, जेव्हा अमेरिकेत व जगभरात अनेक ठिकाणी सामाजिक अंतर धोरण (शाळा व उपहारगृह बंद आणि कार्यक्रम रद्द झाले) व घरात बसण्याचे आदेश लागू झाले.
सोम | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनि | रवि | |
---|---|---|---|---|---|---|---|
फेब २४- मार्च ०१ | ३९.४ | ३८.३ | ३७.९ | ३८.२ | ३७.० | ४०.२ | ४२.८ |
मार्च ०२- मार्च ०८ | ३८.१ | ३८.० | ३६.४ | ३६.१ | ३५.४ | ३८.६ | ४०.७ |
मार्च ०९- मार्च १५ | ३७.९ | ३७.४ | ३७.७ | ३४.९ | ३४.७ | ३८.४ | ४१.५ |
मार्च १६- मार्च २२ | ३८.९ | ३७.७ | ३९.३ | ३९.५ | ३९.१ | ४१.१ | ४३.० |
मार्च २३- मार्च २९ | ४१.७ | ४१.८ | ४१.६ | ४१.७ | ४१.७ | ४३.७ | ४५.९ |
मार्च ३०- एप्रिल०५ | ४३.९ | ४५.२ | ४६.७ | ४७.१ | ४६.७ | ४९.१ | ५४.१ |
टिप्पण्या आणि टाळ्या
तक्ता: दैनंदिन टिप्पण्यांचा आकडा तसेच आठवड्याची रहदारी मे १, २०१९ ते मे १, २०२० दरम्यान. टिप्पण्या नागमोडी रेष तयार करतात(आठवड्यांच्या अंताला जास्त टिप्पण्या!) ज्या मध्य मार्च ला वेगाने वाढतात. आठवड्यांचे पृष्ठ दर्शन हे टिंबांच्या मालिकेच्या आधारे दर्शविले आहेत ज्यांचा कल साधारण सारखाच आहे पण शेवटी खूप वाढ दिसत नाही.
आमच्या रहदारीच्या आकड्यांमध्ये आम्ही वापरकर्त्यांनी कार्य, शोध परिणाम, किंवा एखाद्याचा दर्शनी फळा बघणे यांत फरक करत नाही, व त्यामुळे प्रत्यक्ष रसिक-कृतींच्या उपभोगाच्या सवयींबद्दल प्रतिपादन करू शकत नाही. परंतु, सुरक्षित पणे असा अंदाज बांधायला हरकत नाही की वाढती रहदारी म्हणजे लोक जास्त रसिक-कृती वाचत, बघत, ऐकत आहेत (आणि आकडेवारी बघता स्वत:च्या पोस्ट करीत आहेत)!
टिप्पणी करण्याची वर्तवणूक ट्रॅक करणे सोपे आहे कारण आपण रोज नवीन भरलेल्या टिप्पण्यांचा आकडा मोजू शकतो. कमाल म्हणजे, मध्य मार्च मध्ये सुरू झालेली टिप्पण्यांतील तीक्ष्ण वाढ याचा दर त्या काळातील वाढलेल्या रहदारी च्या दरापेक्षा जास्त होता: तसेच एप्रिल ची रहदारी फेब्रुवारी पेक्षा २४% नी जास्त होती, टिप्पण्या मध्ये वाढ मात्र तब्बल ४२% नी जास्त होती!
टाळ्यांची वाढ टिप्पण्यांएवढी झालेली नाही,पण त्यांनी रहदारी वाढीच्या दराशी तोल साधला आहे, फेब्रुवारी पेक्षा २३% वाढ आहे. डाटाबेस मध्ये ६८५ मिलियन टाळ्या प्रेमानी स्थानिक आहेत, व अधिक टाळ्यांसाठी अलिकडील टाळ्यांचे स्थलांतर याच्या कृपेने भरपूर जागा आहे.
सरासरी दैनंदिन कार्य | सरासरी दैनंदिन अध्याय | सरासरी दैनंदिन टिप्पण्या | सरासरी दैनंदिन टाळ्या | सरासरी दैनंदिन पृष्ठ दर्शन | |
---|---|---|---|---|---|
जानेवारी | ३,७४९ | १०,२३३ | ७१,२७८ | ५५७,२४८ | ३९.० मिलियन |
फेब्रुवारी | ४,२३७ | ११,००३ | ७१,०१६ | ५६७,५१३ | ३८.९ मिलियन |
मार्च | ३,९२८ | ११,५३५ | ७६,६२१ | ५७३,३६९ | ३९.८ मिलियन |
एप्रिल | ४,५५१ | १३,७३१ | १००,९१६ | ६९७,०४७ | ४८.२ मिलियन |
वार्षिक विकास
तक्ता:२०१२ पासून दर वर्षांची, आठवड्यांच्या पृष्ठ दर्शनांनी मोजलेली, AO3 ची सोडवलेली रहदारी. रहदारी प्रत्येक वर्षी सातत्याने वाढली अाहे, याचा अर्थ असा की मागच्या वर्षापेक्षा नवीन वर्षांची ठिपकेदार रेष वर पासून सुरू होते. २०२० मध्ये, नेहमीचा सौम्य लाटांचा नमुना मध्य मार्च मध्ये एकाएकी बदलतो, ठिपके गगनास भिडतात.
AO3 ने वर्षानुवर्षे सातत्याने वाढ बघितली आहे, साईट च्या रहदारी मध्ये तसेच खाती, रसिकगण, आणि रसिक-कार्य. आपल्याकडे सध्या साधारण २.५ मिलियन नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि ३६,७०० पेक्षा जास्त रसिकगणांमध्ये जवळजवळ ६ मिलियन रसिक-कार्य आहेत. एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही एकूण ३३७ मिलियन पृष्ठ दर्शन नोंद केले.
पहिला आठवडाजाने | पहिला आठवडाएप्र | पहिला आठवडाजुल | पहिला आठवडानोव्ह | |
---|---|---|---|---|
२०१२ | १६.७ | २०.३ | ||
२०१३ | २७.६ | ३१.५ | ३६.५ | ४१.४ |
२०१४ | ४९.५ | ५३.६ | ६२.२ | ६६.० |
२०१५ | ८४.६ | ८७.० | ८९.२ | ९७.८ |
२०१६ | ११९ | १२८ | १३२ | १२८ |
२०१७ | १५८ | १५२ | १६४ | १५८ |
२०१८ | १८९ | १८० | १८८ | १७९ |
२०१९ | २१९ | २१३ | २३६ | २३३ |
२०२० | २८१ | ३३१ |
मागील वर्षांमध्ये, अशी वेळ येऊन गेली आहे जेव्हा मुख्य संगणक साईट च्या वाढलेल्या वापराशी मेळ खाऊ शकला नाही, आणि कळलेखक, तंत्रतपासक आणि तांत्रिक व्यवस्थापकांना मेटाकुटीने AO3 ला आपटण्यापासून वाचवावे लागले आहे. (कधीतरी ते काही काळासाठी पडले देखील) AO3 सारखी मोठी साईट, स्वयंसेवकांच्या जोरावर चालवणे हे जरी आव्हान असले तरी रसिकगण आमच्या पाठीशी आहेत याची जाणीव असल्याने आम्ही मुख्य संगणक खरेदी आणि कंत्राट कार्यांचे पुढील नियोजन सहजतेने करू शकतो. आम्ही पहिली दोन यंत्रे या पासून AO3 च्या विविध भागांचे घर असलेल्या सद्ध्याच्या ३२ मुख्य संगणकांपर्यंत मोठा पल्ला गाठला आहे.
पण नक्कीच, या सर्व हार्डवेअरला साईट वापरणाऱ्या लोकांशिवाय काही अर्थ नाही. चालू असलेल्या जागतीक संकटाच्या काळात रसिकगणांनी कलाकार, लेखक, चीयरलीडर, वाचक, श्रोते, बुकमारकर्स, रेकर्स आणि लर्कर्स म्हणून आभासी समुदायाच्या मार्गे एकत्र येणे बघणे हे उल्हासित करणारे आहे. तुम्ही AO3 ला आपले घर बनवल्याचा आम्हाला अभिमान आहे, व वर्षानुवर्षाच्या तुमच्या आधाराचे आम्ही आभारी आहोत. ❤️
(ही फाईल एप्रिल २०२० पर्यंत चा वापर प्रतिबिंबित करते, व या पुढे अद्ययावत केली जाणार नाही. नवीन चित्तवेधक आकडे पुढील पोस्टस् मध्ये सामायिक केले जाऊ शकतात.)
गूगल तक्त्याचे पर्याय मर्यादित असल्यामुळे, तुम्ही मुक्तपणे ही माहिती वापरून स्वत:ची दृश्य बनवून टिप्पण्यांमध्ये सामायिक करू शकता!