Post Header
आमची सुरक्षितता व देखभालीची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही Archive of Our Own - AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) च्या येण्याच्या नोंदीच्या कोड चे नूतनीकरण केले आहे. जसे आम्ही पूर्वी घोषित केले आहे, या नूतनीकरणामुळे सर्व वापरकर्ते logged out(लाॅग-आऊट) झाले. जर तुम्हाला तुमचे वापरकर्ता-नाव व संकेतशब्द माहित असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे log-in(लाॅग-इन) करता येईल. पण, तुम्हाला अडचण येत असल्यास काही गोष्टी तपासाव्या लागतील.
आपल्या नोंदणी पुष्टी-करण ईमेलमध्ये दिलेल्या दुवेचे अनुसरण करून आपण आपले खाते सक्रिय केले आहे का?
आपण अलीकडेच AO3 वर साइन-अप(नोंदणी) केली असल्यास आणि लाॅग-इन करण्यात समस्या येत असल्यास, आपण आपले अकाउंट सक्रिय केले असल्याचे सुनिश्चित करा! नोंदणी केल्याच्या 24 तासाच्या आत, आपल्याला [email protected] वरून एक नोंदणी पुष्टीकरण ईमेल प्राप्त झाली असेल, ज्यामध्ये समाविष्ट केलेल्या दुव्याचा वापर करून आपल्याला आपले AO3 खाते सक्रिय करण्यास सांगितले असेल. आपले खाते तयार केल्यानंतर सक्रिय-करण ईमेल सहसा लगेचच प्राप्त होतात, परंतु काही ईमेल प्रदाते डिलिवरीला बराच विलंब करू शकतात.
एकदा आपण आपले अकाउंट सक्रिय केल्यानंतर, आपल्याला त्याच ईमेल पत्त्यावरून सक्रिय-करण पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल: [email protected]. काहीवेळा, हे ईमेल स्पॅम फिल्टरमध्ये गमावले जाऊ शकतात, म्हणून हे देखील तपासण्याची खात्री करा! आपण आपल्या सक्रियकरण विनंती किंवा सक्रियकरण पुष्टीकरण ईमेलपैकी दोन्ही सापडू शकत नसल्यास, आणि आपण नोंदणीकृत झाल्यापासून 24 तासांपेक्षा जास्त काळ झाला असल्यास, आमच्या समर्थन समितीशी संपर्क करा व आपले खाते प्रशासकाद्वारे कार्यरत करण्यासाठी विचारणा करा.
आपण आपल्या वापरकर्तानावासह लाॅग-इन करण्याचा प्रयत्न करीत असाल तर ते योग्य आहे का?
वापरकर्तानाव अस्तित्वात आहे व ते आपले आहे का हे तपासण्यासाठी आपल्या browser address bar(चाळक पत्ता पट्टी) वर जाऊन https://archiveofourown.org/users/USERNAME, हे लिहा, USERNAME च्या ऐवजी आपले वापरकर्तानाव लिहा. जर हे अकाउंट अस्तित्वात असेल तर आपल्याला त्याचे Dashboard (दर्शनी फळा) दाखविले जाईल. त्या अकाउंट चे चित्र-खूण, खाते माहिती, किंवा सार्वजनिक कार्य वा वाचनखूणा आपल्याच आहेत याची आपण खात्री करू शकता.
वापरकर्ता नावात फक्त A-Z लोवर-आणि अप्परकेस अक्षरे, आकडे, आणि अंडरस्कोरस् (_) असू शकतात याची कृपया नोंद घ्यावी.
जर आपण आपल्या ईमेल पत्त्याचा वापर करून लाॅग-इन करत असाल तर तो योग्य आहे का?
जर तुमचे एका पेक्षा जास्त ईमेल पत्ते असतील तर हे केल्याने तुम्हाला मदत होऊ शकते, New Password (नवीन संकेतशब्द) पृष्ठ, आपला ईमेल पत्ता भरा, व हे दाबा "Reset Password" (संकेतशब्द रिसेट करा). जर आपण लिहिलेला ईमेल पत्ता कुठल्याही अकाउंटशी संबंधित नसेल तर आपल्याला त्रुटी संदेश दिला जाईल व कुठलाही ईमेल पाठवला जाणार नाही. आपल्या सर्व ईमेल पत्त्यांसह हे केल्याने आपला कुठला ईमेल पत्ता AO3 अकाउंटशी जोडलेला आहे हे निश्चित करण्यास आपणांस मदत होईल.
जरी आपणांस संकेतशब्द रिसेट ची ईमेल आली असेल तरी आपण आपल्या नेहेमीच्या संकेतशब्दा ने लाॅग-इन करू शकाल(ईमेल कडे दुर्लक्ष करा).
आपला संकेतशब्द योग्य आहे का?
जर आपण आपले वापरकर्तानाव व ईमेल पत्ता योग्य आहे हे निश्चित केले असेल तर आपल्या संकेतशब्दा मध्ये समस्या असू शकते. यावरील फाॅर्म भरा New Password पृष्ठ व ज्यावर आपला संकेतशब्द बदलता येईल अशी दुवा आपल्याला पाठवली जाईल.
जर आपल्याला २४ तासांत ईमेल प्राप्त झाली नाही तर आपला स्पॅम फोल्डर किंवा स्वयंचलित इनबाॅक्स वर्गीकरण तपासा. त्या ईमेल चा विषय “[AO3] Reset your password" (AO3(आमचा स्वत:चा संग्रह) संकेतशब्द रिसेट) असेल.
सुधारणा (२८ डिसेंबर, १०.४३ UTC): संकेतशब्दा मधील सुधारणा बदलामुळे आपल्याला हे करावे लागेल संकेतशब्द रिसेट करा जर त्या मध्ये आधी हे < किंवा > वर्ण असतील. (तुम्ही < and > हे वापरणे सुरू ठेऊ शकता, ते फक्त आमच्या नवीन प्रणाली मध्ये अद्यतनीत करावे लागेल.)
आपला चाळक किंवा संकेतशब्द व्यवस्थापक स्वयंचलनाने आपले वापरकर्तानाव/संकेतशब्द घालत आहे का?
जर आपण AO3 मध्ये लॉग-इन करण्यासाठी आपल्या चाळकाचे स्वयं-पूर्ण सेवा किंवा संकेतशब्द व्यवस्थापकाचा वापर करीत असल्यास, जतन केलेले वापरकर्तानाव/संकेतशब्द संयोजन अयोग्य असू शकते. तपासण्यासाठी, पूर्व-वर्धित लॉग-इन माहिती खोडून स्वत: आपले वापरकर्तानाव आणि संकेतशब्द पुन्हा टाइप करा. या समस्येचे आवर्ति प्रतिबंधन करण्यासाठी नंतर पुन्हा कार्यरत संयोजनाने स्वयं-पूर्ण सेवा/संकेतशब्द व्यवस्थापक माहिती अद्यतनित करणे लक्षात ठेवा.
आपण आपल्या चाळकाच्या कुकीज हटविण्याचा प्रयत्न केला आहे का?
काहीवेळा, लॉगिन समस्या चुकीच्या कॉन्फिगर केलेल्या किंवा दूषित कुकीजमुळे असू शकतात. कुकीजच्या समस्यांमुळे त्रुटी संदेश उद्भवेल की आपण प्रविष्ट केलेले संकेतशब्द किंवा वापरकर्तानाव आमच्या नोंदींशी जुळत नाही, ते जेव्हा बरोबर असतील किंवा अशी परिस्थिती असेल जिथे आपल्याला यशस्वी लॉगिन संदेश मिळेल परंतु प्रत्यक्षात लॉग इन होणार नाही. आपली कुकी सेटिंग्ज आपल्याला AO3 वर प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करीत नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी, आपले ब्राउझर AO3 कूकीज स्वीकार करण्यावर सेट केले आहे हे तपासा आणि पुन्हा AO3 प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या कुकीज साफ करा. कुकीजचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना दर चाळक आवृत्तींमध्ये भिन्न आहेत, पण प्रारंभ करण्यासाठी आपल्यासाठी काही दुवे आहेत:
- Firefox (फायरफाॅक्स): कुकी सेटींग्स तपासा आणि कुकीज साफ करा
- Chrome(क्रोम): कुकीज साफ, सक्षम व व्यवस्थापित करा
- Internet Explorer (इंटरनेट एक्सप्लोरर): कुकीज हटवा व व्यवस्थापित करा
- Edge(एज): कुकीज हटवा
- Safari(सफारी):
- Opera (ओपेरा): चाळक डेटा साफ करा आणि पृष्ठांमध्ये कुकीज चे व्यवस्थापन करा
आपण ब्राउझर विस्तार आणि अॅड-ऑन अक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे का?
काहीवेळा, ब्राउझर विस्तार किंवा अॅड-ऑन लॉगिन प्रक्रियेस व्यत्यय आणू शकतात. तुमच्या ब्राउजरची सेटिंग तुम्हाला लॉग इन करण्यापासून रोखत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी, खाली दिलेला दुवा वापरून आपल्या ब्राउझरशी संबंधित कोणतेही अतिरिक्त सॉफ्टवेअर अक्षम करा.
- Firefox (फायरफाॅक्स): ऍड-ऑन अक्षम करा किंवा काढा
- Chrome (क्रोम): आपले विस्तार व्यवस्थापित करा
- Internet Explorer (इंटरनेट एक्सप्लोरर): Internet Explorer मध्ये ऍड-ऑन्स व्यवस्थापित करा
- Edge(एज): Microsoft Edge साठी विस्तार जोडणे,घालणे व काढणे
- Safari (सफारी): मॅक मध्ये सफारी विस्तार घाला व व्यवस्थापित करा
- Opera (ओपेरा): विस्तार
आपण भिन्न चाळक किंवा उपकरण वापरून लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आहे का?
आपण वैकल्पिक साधनांचा वापर करुन AO3 वर यशस्वीरित्या लॉग इन करू शकत असाल तर, आपल्या अकाउंट ऐवजी आपल्या समस्येचे कारण आपला चाळक किंवा उपकरण असण्याची शक्यता आहे. असे असल्यास, आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो की आपल्या प्राधान्य असलेल्या चाळकामध्ये वरच्या क्रमाचे पालन करा, व त्याने काम झाले नाही तर,आमच्या समर्थन समितीस संपर्क करा, जेणेकरून आम्ही अधिक तपास करू शकू. कृपया आपण प्रयत्न केलेले चाळक आणि उपकरण आणि त्याचबरोबर खुद्द समस्या याबद्दल माहिती समाविष्ट करण्याचे स्मरणात ठेवा.
आपण वरील सर्वकाही प्रयत्न केला आहे, आणि लॉग इन करण्यास अद्याप अक्षम आहात का?
जर आपण या सर्व चरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तरी लॉग इन करण्यात अडचण येत असेल, तर कृपया थेट समर्थन समितीशी संपर्क करण्यासाठी हा संपर्क फॉर्म वापरा.
सर्व टिप्पण्या सार्वजनिक असल्यामुळे या पोस्टवरील टिप्पण्यांमध्ये कोणतीही अकाउंटची माहिती शेअर करू नका कारण या पृष्ठावर प्रवेश करणाऱ्या कोणालाही हे दिसू शकते. अकाउंटची माहिती असलेल्या टिप्पण्या उत्तर न देता काढल्या जातील.
नेहमीप्रमाणे, कृपया आपल्या समस्येच्या सूचना जसे की जे त्रुटी संदेश प्राप्त झाले आहेत आणि आपल्या चाळक/उपकरण कॉन्फिगरेशनबद्दल शक्य तितकी जास्तीत जास्त तपशीलवार माहिती समाविष्ट करणे लक्षात ठेवा, जेणेकरून आम्ही अधिक प्रभावीपणे समस्या-निवारण करू शकू. आपण कोणत्या उपरोक्त चरणांचे पालन करून प्रयत्न केले आहेत हे देखील समाविष्ट करा, जेणेकरून आम्ही त्या समस्या नाकारू शकू!