Post Header
पुढील काही दिवसांमध्ये, आम्ही एक नवीन पर्याय जोडणार आहोत, जे निर्मात्यांना Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर टिप्पण्या बंद करण्यास परवानगी देईल. हा पर्याय कोणतेही रसिक-कृती पोस्ट करण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी, तसेच एकाचवेळी एकाधिक रसिक-कृती अद्ययावत करण्याच्या फॉर्मवर उपलब्ध असेल, आणि आम्ही हे नवीन पर्याय सामावून घेण्यासाठी, फॉर्मची ही पुनर्रचना केली आहे.
टिप्पण्या बंद केल्याने काय होते
टिप्पण्या बंद केल्याने आपल्या कामाच्या शेवटी असलेल्या टिप्पणी फॉर्म हा नोटिससह पुनर्स्थित होणार: "Sorry, this work doesn't allow comments" ("क्षमस्व, हे कार्य टिप्पण्यांना परवानगी देत नाही").
जर आपल्या कार्यावर आधीपासूनच टिप्पण्या असल्यास, तर सर्व अस्तित्त्वात असलेल्या टिप्पण्या, आपल्याला आणि आपल्या कामाचे वाचकांना, दिसणार. आपण अद्याप कोणत्याही अवांछित टिप्पण्या काढू शकता किंवा अतिथींच्या टिप्पण्या स्पॅम म्हणून चिन्हांकित करू शकतो.
वापरकर्ते, ज्यांनी आपल्या कामावर लॉग-इन टिप्पण्या दिल्या आहेत, ते त्यांचे टिप्पण्या तरीही काढू शकतात .
वैयक्तिक कामांवरील टिप्पण्या कशा बंद करायच्या
वैयक्तिक कार्यांसाठी पोस्टिंग आणि संपादन फॉर्मच्या "Privacy" (वैयक्तिक माहिती) विभागात, आपल्याला "Who can comment on this work" (या कामावर कोण टिप्पणी देऊ शकेल) सारख्या पर्यायांचा एक संच सापडेल. त्यात तीन पर्याय असतील:
- Registered users and guests can comment (नोंदणीकृत वापरकर्ते आणि अतिथी टिप्पणी देऊ शकतात),
- Only registered users can comment (फक्त नोंदणीकृत वापरकर्तेच टिप्पणी देऊ शकतात) (हे अज्ञात टिप्पणी अक्षम करण्याच्या जुन्या पर्यायाप्रमाणेच आहे),
- No one can comment (कोणीही टिप्पणी देऊ शकत नाही).
डीफॉल्टनुसार, ते "Registered users and guests can comment." वर सेट केले आहे. आपल्या कार्यावर कोणालाही टिप्पणी सोडण्याच्या रोखण्यासाठी, "No one can comment" निवडा आणि आपले बदल जतन करा.
एकाधिक कामांवरील टिप्पण्या कशा बंद करायच्या
जर आपण एकावेळी एकापेक्षा अधिक कामासाठी टिप्पणी सेटिंग्ज बदलू इच्छित असल्यास, तर आपण Edit Multiple Works (एकाधिक कार्ये संपादित करा) पृष्ठ वापरू शकता. (या पृष्ठात प्रवेश करण्यासाठी आणि संपादनासाठी कार्ये निवडण्याबद्दल माहितीसाठी, कृपया "मी एकाच वेळी एकाधिक कामे कशी संपादित करू?" पहा.)
एकदा आपण संपादित करू इच्छित कार्ये निवडल्यानंतर, फॉर्मचा "Settings" (सेटिंग्ज) "विभाग शोधा. तेथे "Who can comment on these works" (या कामांवर कोण टिप्पणी देऊ शकणार) असा पर्यायांचा एक सेट असेल, आणि त्यास चार पर्याय असतील:
- Keep current comment settings (वर्तमान टिप्पणी सेटिंग्ज ठेवा)
- Registered users and guests can comment
- Only registered users can comment (हे अज्ञात टिप्पणी अक्षम करण्याच्या जुन्या पर्यायाप्रमाणेच आहे)
- No one can comment
डीफॉल्टनुसार, ते "Keep current comment settings." वर सेट केले आहे. आपल्या कार्यावर कोणालाही टिप्पणी सोडण्याच्या रोखण्यासाठी, "No one can comment" निवडा आणि आपले बदल जतन करा.
आपल्या कार्यांवर टिप्पण्या नियंत्रित करण्यासाठी इतर पर्याय
कृपया आपल्या कार्यांवर टिप्पण्या नियंत्रित करण्याच्या अधिक माहितीसाठी आमचे टिप्पण्या आणि टाळ्या वाविप्र पहा.: