AO3 News

Post Header

Published:
2020-12-13 17:27:12 UTC
Original:
Upcoming changes to images
Tags:

पुढच्या काही दिवसांमध्ये, रसिक-कार्यांमध्ये चित्र कशी प्रदर्शित होतात यामध्ये आम्ही काही छोटे बदल करणार आहोत. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) लहान पडद्यांसाठी अनुकूल कर ण्यासाठी, चित्रे आपल्या पडद्याच्या कमाल रुंदीपेक्षा मोठी नसतील याची खात्री ठेवण्यासाठी आम्ही चित्रांचे मूलभूत प्रदर्शन अद्ययावत करीत आहोत.

आधी आणि नंतर: कार्य ज्याच्या उजव्या बाजूने AO3 चा लोगो आंशिक कापला गेला असेल, आणि आकार सुधारित केलेला असेल ज्यामुळे पूर्ण चित्र पडद्यावर मावेल.

हा बदल जुन्या व नवीन दोन्ही कार्यांना लागू होतील, व हे CSS वापरून केले जाईल. याचा अर्थ असा की, AO3 वर चित्र कसे प्रदर्शित होईल फक्त यावर परिणाम होईल - चित्र फाईल्स मध्ये काही बदल होणार नाही.

जर आपण कलाकार असाल आणि आपल्याला इतरांसाठी आपली कला मोठ्या आकारामध्ये बघणे सोपे करायचे असेल तर, आम्ही आपल्याला मोठ्या आकाराच्या चित्राची दुवा प्रदान करण्याची शिफारस करतो. HTML बरोबर दुवा कशी बनवावी हे आमचे वाविप्र स्पष्ट करतात, किंवा आपण आमच्या रिच मजकूर संपादक यावरचे दुवेचे बटण वापरा.

कलाप्रेमी, ज्यांना पूर्ण आकारामध्ये चित्र बघायचे असेल, त्यांना आपला चाळक मदत करेल! आपल्या डिव्हाइस किंवा चाळकाच्यावर अवलंबून हे मार्गदर्शन बदलेल, पण साधारणपणे, मेन्यु उघडण्यासाठी चित्रावर उजवे-क्लिक (किंवा आपल्या डिव्हाइस वरचे समतूल्य) करा, जिथे आपल्याला दुसऱ्या टॅब वर चित्र उघडण्यासाठी किंवा चित्राचा वेब पत्ता काॅपी करण्यासाठी पर्याय मिळेल, त्याला आपण भेट देऊ शकता. जास्त तपशीलवार माहितीसाठी, आपण आपल्या आवडत्या शोध इंजिन वर जाऊन "दुसऱ्या विंडो मध्ये चित्र उघडा" हे शोधा आणि आपल्या चाळकाचे, ॲापरेटिंग प्रणालीचे, किंवा डिव्हाइस चे नाव आणि आवृत्ती आपण शोधावे अशी शिफारस आम्ही करतो.