Post Header
मागच्या वर्षी मे मध्ये, आम्ही हे पोस्ट केले होते Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) च्या रहदारी आकड्यांची एक झलक, जे वर्षाच्या सुरूवातीस बरेच वाढले होते (बहुधा पँडेमिक संबंधित कारणांमुळे). आमच्याकडे आता पूर्ण वर्षाचे आकडे आहेत आणि आम्ही ही पुष्टी करू शकतो की हो, २०२० मध्ये लोकांनी खूप रासिककार्य बघितली! आम्ही तुम्हाला २०२१ च्या पहिल्या त्रीमाही मधल्या रहदारीच्या आकड्यांवर पण एक संक्षिप्त अद्यतन देऊ शकतो.
२०२० मधील दैनंदिन रहदारी
चित्र:एक तक्ता ज्यावर AO3 वरची रहदारी प्रती दिन मिलियन पृष्ठ दृष्यतेच्या हिशोबाने, २०२० च्या दर महिन्यासाठी दर्शविली आहे. रहदारी सातत्याने रविवारी शिखर गाठते, ज्या मुळे मासिक ओळींच्या टेकड्या आणि दऱ्या बनतात. जानेवरी ते मार्च साठी, या ओळी ३५ ते ४० मिलियन पृष्ठ दृष्यते वरती सामूहिक होतात; बाकीच्या महिन्यांचा समूह त्याच्या बऱ्याच वर आहे, ४५ आणि ५५ मिलियन च्या मधे, त्याच डिसेंबर च्या रविवार ची चरमसिमा ६० मिलियन च्या जवळ पोचते.
मार्च मधील रहदारी, वरील तक्त्यात हिरव्या ओळीने प्रतिनिधित्व करणारी, महिन्याच्या मध्यस्थानी भरमसाठ पणे वाढू लागली. त्याच्या नंतरच्या ६ महिन्यात एकूण उच्चतर रहदारीचे वैशिष्ट्य होते, आणि कामाचा आठवडा आणि आठवड्याच्या अंता मधला फरक कमी झाला.
सोमवार पृष्ठ दृष्यतेसाठी नोंदणी झालेला सगळ्यात कमी आकडा ३१.३ मिलियन, १३ जानेवरी ला पाहिला गेला तसंच तेव्हाच्या ठराविक रविवारी ४३ मिलियन वर होता. एप्रिल ते सेप्टेंबर मध्ये, साधारणपणे ४५ मिलियन आणि ५१ मिलियन च्या मधे पृष्ठ दृष्यता झाली.
ऑक्टोबर च्या अंतामध्येच, रहदारी नव्या सामान्य आकडांच्या वर जाऊ लागली, त्याच नोव्हेंबर मध्ये एका नंतर एक अधिकतम रेकॉर्ड झाले, जे केशरी रंगाने दाखवलेले आहे. डिसेंबर, लाल रंगात दर्शविले आहे, AO3 साठी दर वेळेस सगळ्यात व्यस्त हा महिना राहिला आहे, आणि २०२० मध्ये पण हे खरे ठरलं. सर्वात उल्लेखनीय म्हणजे डिसेंबर २४ आणि डिसेंबर ३१ ला झालेले रहदारी चे अचानक कमी होणे, पण दोन्ही सुट्ट्यांच्या मधे पृष्ठ दृष्यतेचा डोंगर झाला. २०२० चे रेकॉर्ड रविवारी, डिसेंबर २७ ला, ६१.१ मिलियन पृष्ठ दृष्यतेसोबत नोंदवले गेले.
📈 उपलब्ध माहिती आपल्याला या स्प्रेडशीट वर सापडेल:२०२० मधली AO3 ची दैनंदिन रहदारी (गूगल शीट्स, इंग्रजी मध्ये)
२०२० मधील साइट सक्रियता
चित्र: एका ओळीचा तक्ता ज्यामध्ये २०२० मध्ये दर महिन्याला किती टिप्पण्या प्राप्त झाल्या आणि किती पृष्ठ दृष्यता नोंदवली गेली हे दाखवले गेले आहे. टिप्पण्या काळ्या आहेत, ज्या जानेवरी मध्ये अंदाजे २.१५ मिलियनने सुरू होतात आणि डिसेंबर मध्ये अंदाजे ३.५ मिलियनला संपतात. रहदारी लाल आहे जी १.२ बिलियनला सुरू होते आणि १.७ बिलियनला संपते. जून आणि सेप्टेंबर मध्ये थोडे खाली, आणि डिसेंबर मध्ये परत वेगाने वर असा सामाईक नमुना बघितला गेला, दोन्हीचा कल वर जाणारा होता,.
जशी जशी साइट वरची रहदारी मागच्या वर्षी मार्च पासून वाढू लागली, तशी वापरकर्ता हालचाल जसे की नवी रासिककार्य, अध्याय, वाचनखुणा, टिप्पण्या आणि टाळ्या हे निर्माण होणे पण वाढले. वापरकर्त्यांनी मार्च महिन्यात अंदाजे २.३ मिलियन टिप्पण्या प्रकाशित केल्या, जानेवरी पेक्षा अंदाजे १५०,००० जास्तं. एप्रिल मध्ये, हा आकडा २.९ मिलियन वर पोचला.
(या सामायिक ट्रेंड चे अनुसरण करीत, वापरकर्त्यांनी टाळ्यांचं बटण मार्च च्या महिन्यात १७.३ मिलियन वेळा निवडलं, ह्याच्या तुलनेत जानेवरी मध्ये १६.९ मिलियन वेळा हे बटण निवडलं गेलं. एप्रिल मध्ये: २०.४ मिलियन.)
📈 उपलब्ध माहिती आपल्याला या स्प्रेडशीट वर सापडेल:२०२० मधील AO3 ची मासिक सक्रियता (गूगल शीट्स, इंग्रजी मध्ये)
मागील वर्षांमधील रहदारी
चित्र: एक तक्ता जो AO3 ची २०१२ च्या मध्या पासून २०२० च्या अंतापर्यंत, साप्ताहिक पृष्ठ दर्शन नि मोजली जाणारी रहदारी मधली वाढ दाखवतो. दर आठवडा एक ठिपका आहे, आणि एक वर्ष त्या ठिपक्यांची एक ओळ आहे. रहदारी दर वर्षी वर जाते, त्याच्यात पुनःपुन्हा येणारे पॅटर्न दिसतात. उदाहरणार्थ, सेप्टेंबर हा एक मंद महिना आहे, ज्याच्यात आपल्याला लक्षात येण्यासारखे उतार दिसतात. सर्वाधिक ओळी बऱ्याच जवळ आहेत, ज्या वर्षानुवर्षाच्या रहदारी मधली स्थिर वाढ दर्शवतात, तसेच २०१९ आणि बऱ्याचश्या २०२० मध्ये जास्त अंतर दिसते. सर्वात खालची दरी: जून २०१२ चं शेवटचा आठवडा १५.८ मिलियन. सर्वात उंच टोक: डिसेंबर २०२० चं शेवटचा आठवडा ४१९ मिलियन.
परत, २०२० मध्ये मध्य मार्च दरम्यान एकदम वाढ दिसली, जेव्हा जगभरात लॉक डाऊन होऊ लागले आणि/किंवा लोकं स्वयं-विलगीकरण करू लागले. रहदारी वाढून जानेवरी व फेब्रुवरी मध्ये अंदाजे २७० मिलियन दर आठवड्याचे पृष्ठ दृष्यतेवरून एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ३३० मिलियन आणि मे पर्यन्त ३४० मिलियन पर्यंत गेली. याच वेळी २०१९ मध्ये, दर सप्ताहाची पृष्ठ दृष्यता रहदारी अंदाजे २३० मिलियन होती.
ऑक्टोबर च्या अंतापर्यंत रहदारी ३५० मिलियन पर्यन्त पोहोचली होती, जसे मागच्या काही वर्षांत बघण्यात आलं होतं, आणि मग वर्षाच्या शेवटी परत वाढू लागली. जानेवरी चा पहिला आठवडा, ज्या मध्ये डिसेंबर चा अंत ही समाविष्ट होतो, तिथे नेहमी विक्रम उच्चांक पोहोचलेले दिसतात.
तुलनेसाठी, खाली सप्ताहाच्या अंताचे पृष्ठ दृष्यतेचे आकडे (मिलियन मध्ये) दिले आहेत:
- जानेवरी ०६, २०१३: २७.६
- जानेवरी ०५, २०१३: ४९.५
- जानेवरी ०४, २०१५: ८४.६
- जानेवरी १०, २०१६: ११४
- जानेवरी ०८, २०१७: १५८
- जानेवरी ०७, २०१८: १८९
- जानेवरी ०६, २०१९: २१९
- जानेवरी ०५, २०२०: २८१
- जानेवरी १०, २०२१: ४१४
📈 उपलब्ध माहिती आपल्याला या स्प्रेडशीट वर सापडेल: २०२० मधील AO3 ची साप्ताहिक रहदारी (गूगल शीट्स, इंग्रजी मध्ये)
२०२१ मधील दैनंदिन रहदारी
चित्र:एक तक्ता जो AO3 प्रती दिन मिलियन पृष्ठ दृष्यता रहदारी, २०२१ च्या जानेवरी, फेब्रुवरी आणि मार्च साठी दाखवतो. रहदारी सातत्याने रविवारी चरमसीमा गाठते, ज्या मुळे मासिक ओळींच्या टेकड्या आणि दर्या बनतात. जानेवरी मध्ये, दैनंदिन पृष्ठ दृष्यता ५८ मिलियन आणि ६४ मिलियन च्या मधे राहिली. फेब्रुवरी आणि मार्च मध्ये रहदारी जास्त होती (६० आणि ६६ मिलियन च्या मधे), आणि दोन्ही महिन्यात जवळजवळ समान आकड्यांसह सारखा पॅटर्न बघितला गेला, सोमवार ते शुक्रवार मध्ये कमी रहदारी आणि आठवड्याच्या अंताला एकदम वाढ. रविवारी, मार्च २८, ला एक नवीन विक्रम साध्य झाला, जेव्हा पृष्ठ दर्शन ६८.६ मिलियन ला पोहोचले.
२०२१ मध्ये साइट वापर जास्तच आहे, पण सध्या ७० मिलियन च्या थोडं खाली स्थिर झाला आहे. रहदारी आत्ता खूप वाढत नसली तरी, २०२१ हे अजून एक विक्रम मोडणारे वर्ष घडणार असे दिसत आहे!
आम्ही त्या सगळ्या लोकांचे आभारी आहोत जे AO3 वापरुन रसिककार्य इतरांना दाखवतात व स्वतः त्यांचा आनंद घेतात, आमचे सगळे देणगीदार ज्यांच्यामुळे आम्ही एवढी रहदारी हाताळण्यास प्रबळ मुख्य-संगणकावर खर्च करू शकतो, आणि आमचे सगळे स्वयंसेवक जे या साईटला चालू ठेवतात. या वर्षात पुढे काय मांडून ठेवले आहे हे बघण्यास आम्ही उत्सुक आहोत!
📈 उपलब्ध माहिती आपल्याला या स्प्रेडशीट वर सापडेल: २०२१ च्या पहिल्या त्रीमाही मधील AO3 ची दैनंदिन रहदारी (गूगल शीट्स, इंग्रजी मध्ये)