Post Header
येण्याऱ्या काही दिवसांत, आम्ही Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मधल्या कोड मध्ये बदल आणणार आहोत ज्यामुळे एका रसिककृतीमध्ये एकूण किती रसिकगट, व्यक्तिरेखा, नाती, आणि अतिरिक्त टाचणखुणा जोडल्या जाऊ शकतात त्यास मर्यादा ठेवली जाईल. ही ७५ टाचणखुणांची मर्यादा दोन्ही नव्या आणि विद्यमान रसिककृतींना लागू पडेल, पण विद्यमान कार्यांमधून कोणत्याही टाचणखुणा आपोआप काढल्या जाणार नाहीत.
टाचणखुणांवर ही मर्यादा का?
टाचणखुणांवर ही मर्यादा ठेवून:
- कार्यांचे सारांश योग्य लांबीचे होण्यास मदत होईल, कार्य सूची नॅव्हिगेट करण्याचा अनुभव सुधारेल, आणि
- टाचणखुणा त्यांच्या रसिककृती च्या सगळ्यात महत्वाच्या घटकांसाठीच वापरण्यास निर्मात्यांना प्रोत्साहन मिळेल, व त्यामुळे शोध निकालांची गुणवत्ता सुधारेल.
७५ टाचणखुणा का?
आम्ही AO3 वरच्या सगळ्या रसिककृत्यांकडे बघितले आणि आम्हाला हे समजले की:
- दर रासिककृती मध्ये टाचणखुणांची सरासरी संख्या १७ आहे,
- दर रसिककृती मध्ये वापरल्या जाणाऱ्या टाचणखुणांची सर्वात सामान्य संख्या ११ आहे, आणि
- ०.५% पेक्षा कमी रसिककृत्यांमध्ये ७५ पेक्षा जास्त टाचणखुणा वापरल्या गेल्या आहेत.
एका रासिककृती मध्ये एकूण ७५ रसिकगट, व्यक्तिरेखा, नाती, आणि अतिरिक्त टाचणखुणांच्या मर्यादेमुळे बर्याचश्या निर्मात्यांना त्यांच्या रसिककृतीच्या मजकुरा विषयीचे वर्णन करायला पुरेशी जागा असेल आणि त्याच वेळी कार्य-सारांश व्यवस्थापित लांबी मध्ये राहील.
गुणांकन, प्रकार, आणि चेतावण्या हे मर्यादेमध्ये मोजले का नाही जाणार?
गुणांकन, प्रकार, आणि चेतावण्या यांना आधीपासूनच मर्यादा आहेत. एका रासिककृतीस एकच गुणांकन असू शकते, आणि प्रति कार्य, प्रकाशन फॉर्म मध्ये दिसणारे प्रकार आणि चेतावण्या यांच्या पर्यायांची संख्या मर्यादित आहेत.
जर मला असे दिसले की कोणाच्या रसिककृती मध्ये एकूण ७५ पेक्षा जास्त रसिकगट, व्यक्तिरेखा, नाती, आणि अतिरिक्त टाचणखुणा आहेत, तर मी काय करू?
काहीही नाही! रसिककृत्या ज्या टाचणखूण मर्यादा पार करतात त्या नियम आणि ध्येयधोरणे (इंग्रजी मध्ये) चे उल्लंघन करीत नाहीत आणि नियम आणि तक्रारनिवारण समिती किंवा समिती-संवाद समिती कडे हे नोंदवणे गरजेचे नाही.
जर काही विद्यमान रसिककृत्यांमध्ये एकूण ७५ पेक्षा जास्त रसिकगट, व्यक्तिरेखा, नाती, आणि अतिरिक्त टाचणखुणा असतील तर काय होईल?
काहीही नाही! ती रसिककृती आपल्या सगळ्या टाचणखुणा ठेवेल.
पण, जर निर्मात्याला रसिककृती मध्ये काही बदल आणायचे असतील किंवा एक अध्याय जोडायचा असेल तर त्यांचे बदल जतन करण्या पूर्वी त्यांना त्यांचे काही रसिकगट, व्यक्तिरेखा, नाती, आणि/किंवा अतिरिक्त टाचणखुणा काढावे लागतील. (एक त्रुटीसंदेश निर्मात्यास सांगेल की किती टाचणखुणा काढाव्या लागतील.)