Post Header
पुढील काही दिवसांमध्ये, आम्ही वापरकर्त्यांना भेटवस्तू कोण देऊ शकते यावर अधिक नियंत्रण देण्यासाठी एक नवीन प्राधान्यखुण आणणार आहोत. वापरकर्त्यांना Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर त्यांचा अनुभव नियंत्रित करण्यादृष्टीने अधिक पर्याय देण्यासाठी आणि अवांछित परस्परसंवाद मर्यादित करण्यासाठी हा बदल आमच्या चालू असलेल्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
प्राधान्यखुणे अंतर्गत असे म्हटले जाईल "Allow others to give me gift works outside gift exchanges and prompt memes." (इतरांना मला भेटवस्तू देवाणघेवाणी शिवाय आणि विस्तारासाठी कल्पनाबीज-एतर भेटवस्तू देण्यास अनुमती द्या.).
ही प्राधान्यखुण सक्षम केल्यावर, कोणतेही AO3 वापरकर्ता तुम्हाला काम देऊ शकतात. हे AO3 वरील वर्तमान वर्तन आहे आणि ते सर्व विद्यमान वापरकर्त्यांसाठी मूलभूत वर्तन असेल.
जेव्हा प्राधान्यखुण अक्षम केले जाते, फक्त तेच वापरकर्ते जे तुम्हाला कामे देऊ शकतील ते असे वापरकर्ते असतील ज्यांना भेटवस्तू देवाणघेवाणमध्ये तुमच्यासाठी रसिककृती तयार करण्यासाठी नियुक्त केले गेले आहे किंवा तुमच्या अज्ञात लेखनबीज पैकी एकावर दावा केला आहे विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये. दुसऱ्या शब्दांत, जर तुम्हाला कोणाकडूनही भेटवस्तू मिळवायची नसतील, तर तुम्ही हे प्राधान्य अक्षम करू शकता आणि आव्हानांसाठी नोंद करणे टाळू शकता.
अंमलबजावणी झाल्यानंतर तयार केलेल्या खात्यांसाठी प्राधान्यखुण मूलभूत पणे अक्षम केले जाईल. (आम्ही सहसा कोणतीही नवीन प्राधान्यखुणे मूलभूतनुसार अक्षम करू, परंतु चालू आव्हानांमध्ये हस्तक्षेप टाळण्यासाठी भेटवस्तूंना परवानगी देणे आवश्यक आहे.)
जर वापरकर्त्याचे प्राधान्यखुण अक्षम केले असेल आणि तुम्ही त्यांना विनंती न केलेली भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला वापरकर्ता भेटवस्तूंना परवानगी देत नाही हे सांगणारा त्रुटी संदेश मिळेल.
प्राधान्यखुण फक्त नवीन भेटवस्तूंना लागू होते, त्यामुळे तुम्ही प्राप्तकर्त्याला न काढता कोणतीही विद्यमान भेटवस्तू संपादित करू शकता.
तुम्ही प्राधान्यखुण सक्षम किंवा अक्षम केले असले तरीही तुमचे Your Gifts (भेटवस्तू) पृष्ठ प्रवेशयोग्य राहील. आपण अद्याप विद्यमान किंवा नवीन भेटवस्तू नाकारण्यास सक्षम असाल.
थांबा, काय?
- तुम्ही विद्यमान AO3 वापरकर्ता असल्यास, तुम्ही तुमची प्राधान्यखुणे अद्यतन केल्याशिवाय काहीही बदलणार नाही.
- तुम्हाला भेटवस्तूंची कामे कधीच मिळवायची नसतील, तर तुम्ही तुमच्या प्राधान्यखुण पृष्ठावरील "इतरांना मला भेटवस्तू देवाणघेवाण आणि विस्तारासाठी कल्पनाबीज च्या बाहेर भेटवस्तू देण्यास अनुमती द्या" अनचेक करू शकता आणि कोणत्याही आव्हानांसाठी नोंद करणे टाळू शकता.
बदल केव्हा अंमलबजावणी केले जातील ते तुम्हाला कळवण्यासाठी आम्ही या पोस्टची इंग्रजी आवृत्ती अद्यतन करू.