AO3 News

Post Header

OTW सदस्यता मोहीम, ऑक्टोबर १८-२०

तुम्हाला आठवतंय का ते एक रसिककथा ज्याने तुम्हाला पहिल्यांदाच पहाटेपर्यंत वाचत ठेवले? किंवा रसिककला किंवा चित्रफीत ज्याने तुम्हाला त्याच्या निर्मात्याने सामायिक केलेली सर्व कामे शोधण्यास प्रवृत्त केले? तुमचा जन्म होण्याआधी कथा लिहिणाऱ्या लेखकांच्या कथांचा शोध घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुम्ही हे सर्व आणि बरेच काही Fanlore (फॅनलोर) वर शोधू शकता – रसिककृती, रसिक निर्माते आणि रसिक-इतिहासासाठी विकी!

फॅनलोर हा OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) द्वारे चालवला जाणारा एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश रसिकांना त्यांचे इतिहास, अनुभव आणि परंपरा नोंद करण्यासाठी आणि इतरांना दाखवण्यासाठी एक जागा प्रदान करणे आहे. फॅनलोर आमच्या रसिकांच्या समुदायांचा इतिहास आणि सद्यस्थिती या दोन्हीची नोंद करते – रसिककृत्या, रसिकांचे क्रियाकलाप, रसिक शब्दावली, वैयक्तिक रसिक आणि रसिक- कार्यक्रम. जुन्या काळात रसिकगट कसे होते याबद्दल तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या स्वतःच्या रसिकगटामध्ये संस्मरणीय घटनांचे दस्तऐवजीकरण करू शकता, हे सर्व फॅनलोरवर! विकीचे नवीन वापरकर्ता पोर्टल पहा किंवा इतर संपादक आणि वापरकर्त्यांशी कनेक्ट होण्यासाठी फॅनलोर डिस्कॉर्ड सर्व्हर मध्ये सामील व्हा.

आमचे सर्व प्रकल्प चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे सहकारी रसिकांच्या उदार देणग्या आणि अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या स्वयंसेवकांच्या शिवाय आम्ही या प्रेमळ इतिहासाचे जतन करू शकणार नाही. नेहमीप्रमाणे, आमच्याकडे काही चमकदार नवीन देणगी भेटवस्तू आहेत!

आमच्या काही नवीन धन्यवाद-भेटवस्तूंसह तुम्ही तुमचे प्रेमप्रदर्शन निवडू शकता. US$४० देणगीसाठी, आमच्याकडे लोकप्रिय Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चे टॅग असलेले नवीन स्टिकर सेट आहे. तुम्ही US$५० च्या देणगीसाठी "my other car is a ship" (माझी दुसरी कार एक जहाज आहे) असे बंपर स्टिकर दाखवू शकता. US$७५ किंवा त्याहून अधिक देणगीसाठी, तुम्ही पांढऱ्या आणि लाल शॉपिंग बॅगसह तुमचा किराणा सामान घरी घेऊन जाऊ शकता किंवा आमच्या इंद्रधनुष्य टाळ्या पिनसह तुम्ही AO3 साठी तुमचे प्रेम जाहीर करू शकता.

AO3 लोगो सोबत इंद्रधनुष्य रंगाचे हृदय ची पिन

माझी दुसरी कार एक जहाज आहे हे लिहलेलं बंपर स्टिकर

किराणाच्या सामानाची बॅग ज्याच्यावर OTW चा लोगो आणि त्या लोगो च्या खालच्या डाव्या बाजुला TWC, Legal Advocacy, Fanlore, Fanhackers, Open Doors, आणि AO3 लिहलेले

तुम्ही आवर्ती देणगी सेट करू शकता आणि तुमच्या आवडीच्या भेटवस्तूसाठी बचत देखील करू शकता. तुम्हाला हवी असलेली भेट निवडा आणि त्या देणगीची एकूण रक्कम तुम्ही निवडलेल्या भेटवस्तूसाठी आवश्यक असलेल्या रकमेपर्यंत पोहोचली नसल्यास, भविष्यातील देणग्या तुम्ही ज्या भेटवस्तूसाठी जतन करत आहात त्यावर लागू केल्या जातील. तुमच्यापैकी यू.एस.मधील लोक नियोक्ता जुळणीद्वारे तुमचे योगदान दुप्पट करू शकतात: हा तुमच्यासाठी पर्याय आहे का हे शोधण्यासाठी तुमच्या एचआर विभागाशी संपर्क साधा.

US$१० किंवा त्याहून अधिक देणगी तुम्हाला OTW चे सदस्य बनण्याची अनुमती देईल. OTW सदस्य संचालक मंडळाला - OTW चे प्रशासकीय मंडळाला मत देऊ शकतात. आत्ताच देणगी दिल्याने आणि "I wish to be a member" (मला सदस्य व्हायचे आहे) बॉक्स निवडल्याने तुम्ही २०२५ OTW बोर्ड निवडणुकीत मतदान करण्यास पात्र व्हाल.

आम्हाला आशा आहे की तुमच्यापैकी बरेचजण देणगी देण्याची संधी घ्याल आणि फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), Legal Advocacy (कायदेविषयक मदत) Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), आणि AO3 यांसारख्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी सदस्य व्हाल. तुमचे योगदान नवीन आणि दीर्घकालीन रसिकांसाठी आमचे प्रकल्प यशस्वी ठेवण्यास मदत करतात!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.