AO3 News

Post Header

Published:
2025-07-20 15:49:10 UTC
Original:
2025 OTW Election Timeline & Membership Deadline
Tags:

OTW निवडणूक बातम्या

संचालक मंडळाच्या नवीन सदस्यांसाठी २०२५ च्या निवडणुकांचे वेळापत्रक प्रदर्शित केल्याची घोषणा करताना OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या निवडणूक समितीला आनंद होत आहे!

पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, झिशिन झांगनी कार्यकाळ संपण्यापूर्वी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.
या वर्षी, खालील संचालक त्यांच्या पदाची अवधि संपल्यामुळे संचालक मंडळ सोडत आहेत:

  • Jennifer Haynes

OTW च्या संचालक मंडळावर ७ संचालक असतात आणि या वर्षी OTW सदस्य २ नवीन संचालक निवडतील, जे तीन वर्षांसाठी हे पद धरतील.

या वर्षाची निवडणूक ऑगस्ट १५-१८ ला होणार आहे. याचा अर्थ असा की कर्मचार्‍यांना आपली उमेदवारी जाहीर करण्याची अंतिम मुदत जून २० आहे.

नेहमीप्रमाणे, निवडणूक सदस्यतेची अंतिम मुदत जून ३० आहे. आपल्याला मतदान करण्याची इच्छा असल्यास, कृपया आपली सदस्यता त्या तारखेस कार्यरत असल्याचे सुनिश्चित करा. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरच्या संपर्क फॉर्म हे वापरून व "माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?" हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.

निवडणुका वेबसाइटवर सदस्य कसे बनायचे ते आपण शोधू शकता, किंवा जर आपण प्रक्रियेस परिचित असल्यास, आपण येथे देणगी देऊ शकता!

जर आपल्याला निवडणूकीच्या ढोबळ प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही निवडणूक धोरण तपासू शकता.

आम्ही उमेदवार आणि मतदार यांच्यातील पुरेशा संप्रेषणा सह, सक्रिय निवडणूक हंगामाची अपेक्षा करीत आहोत, आणि आम्ही आशा करतो की आपण त्याच्यात भाग घ्याल. ताज्या बातम्यांसह अद्ययावत रहाण्यासाठी Bluesky आणि Tumblr वर निवडणूक समितीचे अनुसरण करायला विसरू नका!

आपल्याकडे काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास
निवडणूक समितीशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.